जळगावात रंगणार महिला फुटबॉल स्पर्धा, जाणून घ्या कधीपासून ?

#image_title

जळगाव । फुटबॉल हा जागतिक स्तरावरील लोकप्रिय खेळ आहे. नुकत्याच झालेल्या स्पर्धेतून याची प्रचिती आली आहे. क्रिकेटप्रेमी देशात फुटबॉलची क्रेझ पाहून अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं आहे.

आता जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनेदेखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉलपटू घडवण्यासाठी कंबर कसली असून, १६ वर्षांतील महिला फुटबॉलपटूंसाठी स्पर्धा आयोजित केली आहे.

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (वीफा) च्या मान्यतेने जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन आयोजित पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या संजीवनी दिनानिमित्त मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दि. ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. १६ वर्षांतील मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता तर पारितोषिक वितरण समारंभ दि. १२ रोजी दुपारी ४:३० वाजता होणार आहे.