---Advertisement---

जळगावात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्हा मुक-अधीर असोसिएशन तर्फे ‘जागतिक दिव्यांग दिन’ जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कार्यालयाच्या आवारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण अधिकारी भरत चौधरी, दिव्यांग सेवा राष्ट्रीय सचिव भरत रामा जाधव हे होते.

जळगाव जिल्हा मुक-बधीर असोसिएशनचे अध्यक्ष रामेश्वर झंवर, उपाध्यक्ष शरद लोहार, सचिव तौसिफ शहा, सहसचिव शशिकांत जोशी यांचेसह सदस्य विनोद कोळी, ईलावास खान, आबिद बागवान, अर्जुन पाटील, नितीन महाजन, ज्ञानेश्वर उच्चाके हे हजर होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी हसीना अशफाक शेख, कलीम शेख, सलमान बागवान, खवाबी शेक अलताप, वर्षा उच्चाके, रामकृष्ण राठोड, वैभव पाटील, ज्ञानेश्वर कोळी, शिवाजी लाइसे, कन्हैय्या सोनार, नवाज बागवान यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment