मोठी बातमी : ठाण्याच्या पालकमंत्रीपदी ‘यांची’ लागणार वर्णी !

#image_title

मुंबई : मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर महायुतीतील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः, एकनाथ शिंदे यांना खातेवाटपात कमी महत्त्वाची खाती दिल्याचा आरोप होत आहे. मंत्रीमंडळ विस्तारानंतर महायुतीतील तिन्ही पक्षांत पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. ठाणे, पुणे आणि रायगड सारख्या महत्त्वाच्या जागांवर भाजपचे नेते दावा करत आहेत.

संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला असून, शिंदे यांच्या मंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यात टीकेचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून ताज्या घडामोडी समोर आल्या आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्याच्या पालकमंत्रीपदावर दावा केला होता, कारण ठाण्यात भाजपचे जास्त आमदार आहेत आणि त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजपला मिळावे, अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांना हे पद मिळाल्याची माहिती आली आहे.

गणेश नाईक यांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळू शकते. त्यांनी याआधी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद 13 वर्षे भूषविले होते आणि ठाणे-नवी मुंबईत त्यांना एक मोठा समर्थनवर्ग आहे. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात फार जवळीक नसली तरी भाजपने शिंदेंना शह देण्यासाठी नाईक यांचे नाव पुढे करण्याचा विचार केला होता.

 

तथापि, अखेर ठाण्याचे पालकमंत्रीपद शिंदेंच्या ताब्यात जाण्याची निश्चिती झाली आहे, आणि भाजपचे गणेश नाईक यांना पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.