अमळनेर / पाचोरा : यावल पंचायत समितीच्या शासकीय वाहनाला अपघात होऊन त्यात प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ त्र्यंबक चौधरी यांंचा जागीच मृत्यू झाला. धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ 23 रोजी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
गटविकास अधिकारी चौधरी हे शासकीय वाहनाने (क्रमांक एमएच-19-डीव्ही-4199) यावल येथून नाशिक येथे जात होते. वाटेत भोणे फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या या गाडीने उभ्या ट्रकला ठोस दिली. त्यात गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे क्लिनर साईडला बसलेले होते. त्या बाजूने गाडी ट्रकवर आदळली गेली. त्यात ते जागीच गतप्राण झाले. या अपघातात चालक जखमी झाला आहे.
एकनाथ चौधरी यांच्याकडे अमळनेर पंचायत समितीचा कार्यभार सांभाळून यावल पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार होता.