भयानक कृत्य: लग्नास नकार दिला म्हणून तरुणीला दिलं HIV बाधित रक्ताच इंजेक्शन….एका महिन्यानंतर पीडितीने संपवलं जीवन…!

---Advertisement---

 

एका तरुणीने लग्नास नकार दिला म्हणून त्या तरुणीला HIV बाधित रक्ताच इंजेक्शन देण्यात आल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला असून 24 वर्षीय पीडित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

घटना आहे तेलंगणाची राजधानी हैदराबाद मधली. गेल्या महिन्यात तरुणाने तरुणीकडे लग्नासाठी प्रस्ताव मांडला होता. मात्र तरुणीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने त्याचा राग त्याने मनात धरला आणि आरोपी तरुणाने तरुणीला HIV बाधित रक्ताच इंजेक्शन दिलं.

गेल्या महिन्यात 11 मार्च रोजी ही घटना घडली असून या घटनेतील आरोपीचे नाव मनोहर अस आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तरुण आणि पीडित तरुणी ही नातेवाईक होते. आणि महत्त्वाचं म्हणजे आरोपी तरुणाचे आई-वडील हे आधीच एच आय व्ही पॉझिटिव्ह होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विविध तरुणीच्या आई-वडिलांनी आरोपी तरुणाची एच आय व्ही टेस्ट केली होती. त्याचाही अहवाल हा पॉझिटिव्ह आला त्यामुळे तरुणीने तात्काळ लग्न मोडलं. लग्न मोडल्याचा राग आणि संताप तरुणाच्या मनात होता त्यामुळे त्याने तरुणीला घरात घुसून जबरदस्ती HIV बाधित रक्ताच इंजेक्शन दिलं.

मृत तरुणीच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार, तरुणीला इंजेक्शन दिल्यानंतर ती तीव्र मानसिक तणावाखाली होती. सततची भीती सामाजिक कलंक आणि भावनिक आघात अशी सदर तरुणी हि झुंज देत होती. आणि यातूनच तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर तरुणी ही घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली असून या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली आहे. इंजेक्शन दिल्याच्या एक महिन्यानंतर ही घटना घडली असून आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---