नातेसंबंधांना काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. जिथे एका चुलत भाऊ स्वतःच्या बहिणीच्या एकतर्फी प्रेमात पडला होता. या एकतर्फी प्रेमातून तो त्याच्या बहिणीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा आग्रह करत होता. बहिणीने या संपूर्ण प्रकाराला नकार दिल्याने आरोपीने चक्क बहिणीवर गोळी झाडल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. यात तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनांसाठी धाव घेऊन जखमी मुलीला मोरेनाहून ग्वाल्हेर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पोटात गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. घटनेपासून आरोपी फरार आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस छापे टाकत आहेत.
हेही वाचा : अर्थसंकल्पाचा रेल्वेला फटका ! ‘हे’ शेअर्स कोसळले
ही घटना मोरेना जिल्ह्यातील पोरसा पोलीस स्टेशन परिसरातील शेरपूर गावातील आहे. आरोपीचे नाव कुलदीप राठोड आहे. तो त्याच्या काकाच्या मुलीवर प्रेमात पडला होता आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याचा आग्रह धरत होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कुलदीपने त्याच्या बहिणीला त्याच्यासोबत पळून जाण्यास सांगितले, परंतु तिने नकार दिल्याने तो संतापला आणि त्याने बेकायदेशीर शस्त्राने तिच्यावर गोळी झाडली. गोळी मुलीच्या पोटात लागली, ज्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली.
२४ फेब्रुवारी रोजी होणार होते लग्न
गोळीबारामुळे घरात एकाच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी जखमी मुलीला उपचारासाठी मोरेना येथील रुग्णालयात नेले. तिथे तिची प्रकृती गंभीर पाहून तिला ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले आहे, जिथे ती जीवन-मृत्यूची लढाई लढत आहे. दरम्यान, घटनेपासून आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलीचे लग्न ग्वाल्हेरमध्ये निश्चित झाले होते. तिचे लग्न २४ फेब्रुवारी रोजी होणार होते. परंतु त्यापूर्वी घडलेल्या घटनेने कुटुंबात गोंधळ निर्माण झाला आ