भुसावळ : अजित पर्व युवा जोडो अभियान अंतर्गत भुसावळ येथे रावेर लोकसभा, जळगाव जिल्ह्याचा युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. मेळाव्यात सुरज चव्हाण यांनी युवकांना संबोधित केले. त्याचबरोबर सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत काही युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. रावेर लोकसभा , जळगाव जिल्ह्याचा युवा संवाद मेळावा येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
अजित पर्व युवा जोडो अभियान, युवा संवाद मिळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया यांनी केला होते . याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष संजय पवार, प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील, विनोद देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुसावळ शहराध्यक्ष संतोष चौधरी, सुनील पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार, अमर पाटील, रणजित नरुटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस कुशल देशमुख, भुसावळचे माजी नगरसेवक रवींद्र भालेराव, भुसावळ चे माजी उपनगराध्यक्ष शेख पापा शे. कालू , राष्ट्रवादी युवक काँग्रेस भुसावळ शहराध्यक्ष वसीम शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष अश्विन सुरवाडे यांच्यासह पक्ष संघटनेतील इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.