चाळीसगावहून मनमाडकडे जाणाऱ्या बस आणि कारचा भीषण अपघात, दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

जळगाव: जिल्हयात अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. रोजच अपघाताची बातमी समोर येते आहे, जळगाव जिल्हयात अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे,अश्यातच अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे.नाशिकच्या नांदगाव – संभाजीनगर रस्त्यावर बस व मारुती कारचा भीषण अपघात झाला. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून २ वर्षाचे बालक गंभीर जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गंगाधरी येथे मनमाड आगाराची बस चाळीसगावहून मनमाडकडे येत असताना बस आणि मारुती कारची जोरदार धडक झाली. या अपघात मृतांमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. तीन जण जागीच ठार झाले. तर एक दोन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले.

बस चालकाच्या चुकीने हा अपघात घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. ओव्हरटेक करण्याचा नादात कारला समोरून जोरदार धडक दिल्याचे प्रवाशांचे म्हणणे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.