जळगाव: जिल्ह्यात अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून यात अनेकांना जीवावर मुकावे लागत आहे. यातच आता दुचाकीवर आईला सोबत घेऊन जात असलेल्या कुसुंबा येथील फोटोग्राफी करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाचा पाण्याच्या टैंकरखाली येऊन मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी असून तिच्यावर जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास कुसुंबा गावालगत घडली. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात अविनाश पाटील हा तरुण आपल्या आई वडील यांच्या सहवास्तव्याला होता. तो फोटोशॉपीच्या दुकानात काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शुक्रवारी १७ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता अविनाश त्याच्या आईला घेऊन जळगावकडे जाण्यासाठी निघाला असता कुसुंबाच्या बसस्थानकाजवळ भरधाव येणाऱ्या टँकरने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली.
या धडकेत अविनाश पाटील गंभीर जखमी झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अविनाश पाटील याला नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. अविनाश पाटील यांच्या आईला देखील मार लागला असून त्यांना खा