जळगाव । कार आणि शिवशाही बसमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील चोपडा-धरणगाव रस्त्यावर घडली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी असून त्यांच्यावर चोपडा शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
याबाबत असे की, निजामपूर येथील प्रतिष्ठीत व्यापारी श्रीधर बंडू राणे यांच्या दोघा पुत्रांसह इतर दोन जण असे चार जण कारने मनुदेवीच्या दर्शनासाठी येत होते. मनुदेवी मातेला त्यांच्या मार्फत आज महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली.
त्यांच्या कारचे टायर फुटल्याने कार नियंत्रित होऊन ती चोपड्याहून नाशिकला जाणाऱ्या शिवशाही बसला धडकली. या अपघात निलेश श्रीधर राणे, शैलेश श्रीधर राणे, जितेंद्र मुरलीधर भोकरे (४८) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर चोपडा शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहे या घटनेनं राणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे.