---Advertisement---

धर्मांतरणांसाठी मुंबईहून गाठले धुळे, पण आमदारांसह नागरिकांनी उधळला डाव

by team
---Advertisement---

धुळे : गरीब लोकांना खोटे आमिष दाखवून धर्म परिवर्तनाचा प्रकार वाढीस लागला आहे. अशात धुळ्यातील धर्म परिवर्तनाचा डाव सजग नागरिकांसह आमदार अनुप अग्रवाल यांनी उधळून लावला आहे. धर्म परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्नात असलेल्या युवतींसह महिलांविरोधात सामाजिक कार्यकर्ते रोहित भानुदास चांदोडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहीत चांदोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुंबई येथील तीन महिला धुळे शहरात दाखल झाल्या होत्या. या तिघ महिलांनी धुळे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर गाठून रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी या महिलांनी रुग्ण व त्याच्या नातेवाईकांशी संवाद साधत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये अंधश्रद्धा पसरवून ख्रिश्चन धर्माचा प्रचार व प्रसार केला. हे करत असताना त्यांनी रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना काही छापील पत्रके व पुस्तके यांचे वाटप केले.

रुग्णांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता नसल्याचे आमिष दाखून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार निखील रवींद्र भावसार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या महिलांना जाब विचारत तुम्ही हिंदू धर्मीयांमध्ये एकोपा राहू नये असे कृत्य करीत असल्याचे म्हणाले. यानंतर निखील भावसार यांनी त्यांचे मित्र सामाजिक कार्यकर्ते रोहित चांदोडे हा प्रकार सांगितला. यानुसार रोहित चांदोडे यांनी दखल घेतली, यानंतर या तिन्ही महिलांनी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास आपला मोर्चा मिल परिसरातील रासकर नगराकडे वळविला. येथेही त्यांनी पुन्हा लोकांना फूस लावून धर्मपरिवतनांचा प्रयत्न केला.

हा सर्व प्रकार लक्षात घेता धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, धिरज परदेशी, योगेश थोरात आदींना घेऊन रोहित चांदोडे हे रासकर नगर येथे पोहचले. यावेळी सर्वांना तिघ महिला दुपारी ३ वाजेच्या सुमारास ‘रासकर नगर मध्ये रस्त्यावर भेटल्या. त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांची नांवे रेखा धनराज सैंदाणे वय ४०, ) शालुम धनराज सैंदाणे (वय १८ दोघे रा.रुम. नं.३०. महात्मा गांधी चाळ, हनुमान नगर, कांदीवली (पूर्व) मुंबई) व (३) सुषमा अंकुर वर्मा (वय २९ रा.रुम नं.१५, एकवीरा सोसायटी, चारकोप, कांदीवली (पश्चिम) मुंबई) असे सांगीतले.

आणि तुमच्या हिंदू धर्माच्या मूर्ती पुजेपेक्षा आमच्या धर्माचे काम श्रेष्ठ आहे, असे सांगु लागल्या. त्यावेळी आमदार अग्रवाल व इतरांनी त्यांना सांगीतले की, तुम्ही आमच्या धर्माचे लोकांना वेगळा प्रचार करुन त्यांची दिशाभूल करून दोन धर्मिया मध्ये तेढ निर्माण करीत आहेत. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. या तिन्ही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रोहीत चांदोडे यांच्या तक्रारी वरुन तिघा महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment