---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव येथे २४ जुलै रोजी नाकाबंदी करण्यात आली होती. यादरम्यान, ६४ कोटी ९० लाख रुपये किमतीचे अत्यंत घातक अंमली पदार्थ असलेले अँफेटामाईन ड्रग्स पोलिसांनी जप्त केले होते. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी कारचालक अब्दुल सय्यद याला अटक केली होती. या कारचालकाल एका ट्रीपसाठी हवाला मार्गाने १० ते १५ लाख रुपये मिळत होते.
या प्रकरणात पोलिसांनी अधिक चौकशीकरिता आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यात पोलिसांनी अँफेटामाईन ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार महालिंगम नटराजन याला तामिळनाडूमधील नागापट्टम जिल्ह्यातील विलुंदामावडी येथून अटक केली.
याच प्रकरणातील दुसरा आरोपी महालिंगम नटराजन व त्याची पत्नी विलुंदामावडी येथील माजी सरपंच तर दुसरा मुलगा अॅलेक्स महालिंगम माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. ड्रग्स माफिया महालिंगम नटराजन याचे विलुंदामावडी हे गाव श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असल्याने समुद्र वाहतुकीद्वारे ड्रग्सची तस्करी केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. देशभर या ड्रग्स तस्करीचे पाळेमुळे रोवल्या गेल्याचा पोलिसांना संशय असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.