---Advertisement---
नंदुरबार : जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी मिळवून देऊ असे सांगत नंदुरबार जिल्ह्यात अनेक सुशिक्षित बेरोजगारांकडून आर्थीक फसवणूक केली जात आहे. नवापूर तालुक्यातील एका तरुणाने फसवणूक झाल्याची फिर्याद दिल्यानंतर सुमारे १७ जणांची फसवणूक झाली आहे. युवकाच्या फिर्यादीवरून १७जणांची फसवणूक केल्याविषयीचा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, तरुणाने दिलेल्या नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी स्वरूपात नेमणुका केल्या जात आहेत. नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये घनिष्ट संबंध वा परिचय आहे, अशा काही व्यक्तींनी साखळी निर्माण करीत नोकरी मिळेल, या उद्देशाने येणाऱ्या बेरोजगारांची लूट केली असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून आहे. ३० ते ४० हजार रुपयात नेमणुका मि ळवून दिल्या जात असल्याचेही जिल्हा रुग्णालय परिसरात बोलले जात आहे. हा प्रकार नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यामुळे उघडकीस आला आहे. जिल्हा रुग्णालयासमोरच असलेल्या हॉटेलमधील दोन जणांनी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याचे नवापूर येथील युवकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
१७ हून अधिक जणांची फसवणूक झाल्याची शक्यता, गुन्हा दाखल दरम्यान, नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची तक्रार नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात घोगळपाडा ता. नवापूर येथील सुरज भरत गावीत (वय २२ वर्षे) या तरुणाने नोंदवली. या युवकाने म्हटले आहे की, तुम्हाला नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात सफाई काम गार म्हणून लावून देतो, त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे कृष्णा चिंतामण गावीत आणि मनोज जालमसिंग गावित दोन्ही रा. टोकरतलाव, नंदुरबार या दोघांनी सांगत सुरज कडील कागदपत्र ताब्यात ठेवून घेतले. व वेळोवेळी मोबाईलवर फोन करुन पैशांची मागणी केली. सूरज याने ९ डिसेंबर २०२५ रोजी, १७हजार रुपये कृष्णा गावित याला जिल्हा रुग्णालयासमोरच्या हॉटेलवर दिले. दुसऱ्या दिवशी १० डिसेंबर २०२५ रोजी सुरजने त्याच्या पत्नीचे १७ हजार रुपये सकाळी साडेआठ वाजता पुन्हा हॉटेलवर दिले.
८ जानेवारी २०२६ रोजी सुरजला तुझी ऑर्डर नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात मिळेल असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात नोकरीची ऑर्डर काही मिळाली नाही, म्हणून सुरज आणि त्याची पत्नी २० जानेवारी २०२६ रोजी जिल्हा शासकिय रूग्णालयात ऑर्डर घेण्यासाठी गेले असता अगोदर १७ जणांची देखील अशीच फसवणूक झाल्याचे समजले. यातून सुमारे तीन लाखाहून अधीक रकम या युवकांकडून ओरबाडण्यात आल्याचे समजले. सुरज गावित यांने फिर्याद नोंदवत्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तानाजी बहिरम करीत आहेत.









