ज्वारीच्या शेतात ५५ वर्षीय महिलेची हत्या; विसरवाडी पोलिसांत गुन्हा दाखल…!

---Advertisement---

 

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर-नान्हीपाडा रस्त्यावरील एका ज्वारीच्या शेतात ५५ वर्षीय महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शारीरिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने आरोपीने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९:३० च्या दरम्यान ही घटना घडली. मनिल छगन नाईक (वय २३, रा. गंगापूर, मूळ रा. डोकारे) या संशयित तरुणाने पीडित महिलेवर अतिप्रसंग करून तिचा मृत्यू घडवून आणला. असे फिर्यादित नमुद करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६:२२ वाजता या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली.

या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) आणि ६६ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ११६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---