Assembly Code of Conduct : विधानसभा आचारसंहिता जाहीर; जिल्हाधिकारी यांची माहिती

जळगाव :   भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोषणा केली असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर निकाल जाहीर केले जाणार आहे. निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर सर्वत्र निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून जिल्ह्यातही याची अंमलबजावणी होत असल्याची माहिती  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत दिली.

या पत्रकार [परिषदेत जिल्हाधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांचा निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. त्यानुसार

निवडणुकीसाठी  नामनिर्देशन पत्र दाखल  करण्यासाठी दिनांक 22.10.2024 ते दिनांक  29.10.2024वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 (सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता)

नामनिर्देशन पत्रांची छाननी 30.10.2024 सकाळी 11.00 वाजेपासुन

उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिनांक  04.11.2024 (दुपारी 3.00 पर्यंत)

मतदानाचा दिनांक व वेळ दिनांक – 20.11.2024

मतमोजणीचा दिनांक – 23.11.2024

निवडणूक प्रक्रीया पुर्ण होण्याचा – दिनांक 25.11. 2024

असा कार्यक्रम असणार आहे.

जिल्हयात 11  विधानसभा मतदार संघ आहेत. यात चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, मुक्ताईनगर या मतदार संघांचा समावेश आहे. या 11  विधानसभा मतदार संघांत  एकूण 36 लाख 55 हजार 648 मतदार आहेत. जळगाव शहर मतदार संघांत सर्वाधीक पुरुष व महिला मतदार असून त्यांची संख्या अनुक्रमे 2 लाख 22 हजार 233 व 2 लाख 6 हजार 958  इतकी आहे.

18-20  वयोगटात जिल्ह्यातील 11 मतदार संघांत 1 लाख 35 हजार 466 इतके नवमतदार आहेत. जळगाव शहर मतदार संघांत सर्वाधिक नवमतदार असून त्यांची संख्या 15 हजार 397  इतकी आहे. या खालोखाल जामनेर मतदार संघांत 13 हजार 584  नवमतदार आहेत. तर सर्वांत कमी नवमतदार हे मुक्ताईनगर मतदारसंघांत 10 हजार 325 इतकी आहे.  तसेच जिल्ह्यात 85  ते 120  वर्षाच्या वयोगटात 43 हजार 897  इतकी आहे.  या विभागात सर्वाधिक मतदार हे जळगाव शहर मतदार संघात असून त्यांची संख्या 5 हजार 259  इतकी आहे. तर सर्वांत कमी मतदार एरंडोल मतदार संघांत 2 हजार 936  इतकी आहे.