Jalgaon Crime : जळगावच्या गुन्हेगाराची जामिनावर सुटका ; पोलिसांनी लागलीच केले एमपीडीएअंतर्गत स्थानबध्द

जळगाव : वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या आणि धोकादायक ठरू शकणारा योगेश उर्फ  ऋतिक दिगंबर कोल्हे (३७, रा. आसोदा ता. जळगाव ) याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. तो जिल्हा कारागृहातून बाहेर पडताच त्याला नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेत ही कारवाई केली.

 

योगेश उर्फ रितिक दिगंबर कोल्हे  याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापार्श्वभूमीवर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र ,  तरीदेखील त्याच्या वर्तणुकीत कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याचे दिसून आले. त्याचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक ए. सी. मनोरे यांनी तयार केला. हा स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविण्यात आला होता. यानुसार त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश देण्यात आले होते. तालुका पोलिस स्टेशनला दाखल एका गुन्ह्यात योगेश हा जिल्हा कारागृहात होता.

याप्रकरणी योगेश यास जामीन मंजूर झाल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना मिळाली.  ही माहिती मिळताच  पोलीस उप निरिक्षक गणेश देशमुख, सहायक फौजदार संजय महाजन, पोहेकॉ शरद भालेराव, गिरीश शिंदे, सागर बिडे यांनी त्याला १५ ऑक्टोबर रोजी तो कारागृहातून बाहेर पडताच त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्धत केले.