---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात लम्पीने कहर केला असून आठवडाभरात ९ गुरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण १७८ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून ११२ गुरांवर उपचार सुरू आहेत. तर ५७गुरे बरी झाली आहेत. पशुसंवर्धन विभागाने ३लाख ८५ हजार ४७१ गुरांना लसीकरण झाल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात एवढ्या प्रमाणात लसीकरण झाले काय? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात गाय वर्गीय ४ लाख ९६ हजार ७३१ एवढी गुरांची संख्या आहे. शासनाकडून पशुसंवर्धन विभागाला ४ लाख १० हजार ८०० एवढ्या लसी प्राप्त झाल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात गाय वर्गीय जनावरांना लसीकरण झाल्यास दोन वर्षानंतर लम्पीचा उद्रेक कसा? झाला याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. गुरांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकरी
हतबल झाले आहेत.
---Advertisement---
चाळीसगाव, पाचोरा तालुक्यातही जनावरांना लम्पीची बाधा झाल्याचे पशुपालकांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात बाधित गुरांचा आकडा मोठा असून प्रत्यक्षात पशुसंवर्धन विभागाकडून वस्तूस्थिती दर्शक माहिती लपविले जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याची गंभीर दखल घेत झेडपी सीईओ मिनल करणवाल यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात सर्वाधिक गुरांना बाधा झाली आहेत. गेल्या आठ दिवसात २ गुरांचा मृत्यू झाला आहे. एकट्या या तालुक्यात ४६ गुरे बाधित झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पारोळा तालुक्यात २४ तर धरगाव २६, भडगाव १, चोपडा ८, रावेर ११, यावल ४, जळगाव ६ बाधित गुरांवर उपचार पशुसंवर्धन विभागातर्फे सुरू आहेत.