---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात सरासरी 21 टक्के खरीप पेरणी, सर्वाधिक मुक्ताईनगर तर सर्वात कमी एरंडोलमध्ये लागवड

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात यंदा पावसाने मे महिन्यातच दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे कधी नव्हे ते जिल्ह्यात खरीप पेरण्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यातच सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात 1 लाख 52हजार 831 हेक्टरवर (20.64 टक्के) पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मुक्ताईनगर, पाचोरा आणि जामनेर तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. तर सर्वात कमी एरंडोल तालुक्यात 1 टक्का पेरणी झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिल्ह्याच्या बऱ्याच भागात पाऊस, काही भागात उघडीप असे वातावरण आहे. परंतु आतापर्यंतच्या पावसाचा विचार करता, जिल्ह्यात अजूनही पेरणीलायक पुरेसा पाऊस झालेला नाही. काही परिसरात जमीनीत चांगला वाफसा मिळाल्याने शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीसह खरीप पेरण्यांना सुरुवात केली आहे. बहुतांश ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने लावलेली दमदार हजेरी लावल्याने बागायती कपाशी वाणाची लागवड झालेली आहे. व येत्या काळातही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज यामुळे यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 663.33 मिलीमीटर आहे. जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 123.7 मि.मी. असून आतापर्यंत 50.9 मि.मी. पाऊस पडला आहे. मंगळवार 17 जून रोजी गेल्या 24 तासात सरासरी 5.9 मि.मी पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र 7 लाख 40 हजार 536 हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 लाख 52 हजार 831 हेक्टरनुसार 20.64 टक्के खरीपाची पेरणी झाली असल्याचे जिल्हा कृषी विभागाने म्हटले आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र

तालुका सर्वसाधारण क्षेत्र खरीप पेरणी क्षेत्र टक्के
जळगाव 50463 980 1.94
भुसावळ 25798 3602 13.96
बोदवड 33575 8753 26.07
यावल 40434 1360 3.36
रावेर 2931 7000 23.88
मुक्ताईनगर 28408 15418 54.27
अमळनेर 66259 6987 10.54
चोपडा 58278 6549 11.24
एरंडोल 38001 980 1.00
धरणगाव 41559 3495 8.41
पारोळा 51812 7784 15.02
चाळीसगाव 85312 13073 15.32
जामनेर 98541 40713 41.32
पाचोरा 57984 28416 49.01
भडगाव 34794 8321 23.92
एकूण 740536 152831 20.64

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---