---Advertisement---
जळगाव : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस गजानन महाजन याचा गळा चिरून खून केल्याची घटना नुकतीच घडली होती. मात्र, घटनेचे कारण गुलगस्त्यात होते. अखेर पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली, यातील तिसरा आरोपी मात्र पसार झाला आहे. दरम्यान, अटक आरोपींनी खूनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हरदास डेमशा वास्कले (वय ३५, रा. नांदीया, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) आणि सुरेश नकल्या खरते (वय ३४, रा. धोपा, ता. झिरण्या, ता. खरगोन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील तिसरा आरोपी रिचडिया तुकाराम कटोले (२०, रा. रा. नांदीया, ता. भगवानपूरा) याच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे.
---Advertisement---
रिंगणगाव येथील आठवडे बाजारात सोमवारी सायंकाळी सुरेश खरते व रिचडीया कटोले हे फिरत असताना तेजस यास सुरेश वास्कूले याचा धक्का लागला. यावरुन वाद होऊन सुरेश वास्कूले याने तेजसला शिवीगाळ करून मारहाण केली. रिचडीया कटोले याने त्याच्याकडील चाकूने तेजसच्या गळ्यावर वार करून ठार केले. नंतर त्याला झाडाझुडपांत नेऊन टाकून दिले.
घटना घडल्यानंतर वास्कले हा पत्नी समिता व मुलांसोबत कामानिमित्त आणि त्याच्या शेजारी राहणारा सुरेश खरते हा नातेवाइकांच्या लग्नासाठी गावातून पसार झाले. गावात शेतीकामासाठी आले असताना ते काम अपूर्ण सोडून हे दोघे गायब झाल्याने संशय बळावला. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने वास्कले हा फैजपूर-रावेर मार्गावर लावण्यात आलेल्या नाकेबंदीत अलगद सापडला, तर दुसरा आरोपी सुरेश खरते याला थोपा घाटात जाऊन पोलिसांनी अटक केली. या दोघांनीही खुनाची कबुली दिली आहे.