सलग तीन दिवसाच्या घसरणीनंतर आज सोन्या चांदीच्या भावात वाढ; गुंतवणूकदार आणि ग्राहकांची चिंता वाढली….!

---Advertisement---

 

सलग तीन दिवस घसरण झाल्यानंतर जळगावच्या सराफा बाजारात आज पुन्हा तेजीचे वातावरण दिसून आले. सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली असून गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे पुन्हा लक्ष हे सोने-चांदीकडे वळले आहे.

आज सोन्याच्या दरात सुमारे 3 ते 4 हजार रुपयांची वाढ झाली असून सोन्याचा भाव 1 लाख 55 हजार रुपयांवर पोहोचला आहे. कालपर्यंत सोन्याचे दर 1 लाख 51 हजार रुपयांवर होते. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली. चांदी तब्बल 5 हजार रुपयांनी महागली असून तिचा दर 2 लाख 66 हजार रुपयांवर गेला आहे. काल चांदीचा भाव 2 लाख 61 हजार रुपयांवर होता.

गेल्या काही दिवसांपासून बाजारात सुरू असलेल्या घसरणीनंतर आजच्या वाढीमुळे सराफा बाजारात पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि वाढती गुंतवणूक मागणी याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर होत असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

सलग तीन दिवस घसरणीनंतर सराफा बाजारात आज पुन्हा तेजी परतली आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून सोनं 1 लाख 55 हजार रुपयांवर पोहोचलं आहे. तर चांदीच्या दरातही 5 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली असून चांदी 2 लाख 66 हजार रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरमधील चढ-उतार आणि वाढती गुंतवणूक मागणी यामुळे मौल्यवान धातूंच्या दरात ही वाढ झाल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---