नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा!

---Advertisement---

 

१५ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाकडून ब्लॅकमेल; नराधम मनसूरचे धक्कादायक कृत्य

समाजात डॉक्टर आणि शिक्षकाला देवाचे रूप मानले जाते. पाल्य शिक्षकाकडे सुरक्षित राहील या विश्वासाने आई-वडील त्याला शाळेत किंवा क्लासला पाठवतात. मात्र, नाशिकमधून या विश्वासाला आणि पवित्र गुरु-शिष्याच्या नात्याला पुरता काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे गुपचूप आक्षेपार्ह फोटो काढून, त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करणाऱ्या एका नराधम शिक्षकाचे कृत्य उघडकीस आले आहे. मनसूर नावाच्या या वासनांध शिक्षकाने केलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे नाशिक जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शिक्षक मनसूर हा पीडित १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला शिकवत होता. शिकवत असतानाच त्याने अत्यंत कूट बुद्धीने पीडित मुलीचे काही वैयक्तिक आणि आक्षेपार्ह फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. या फोटोंचा गैरवापर करत त्याने विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. “जर मी म्हणेन तसे केले नाही, तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन आणि तुझ्या कुटुंबाला बदनाम करेन,” अशी धमकी त्याने पीडितेेला दिली. शिक्षकाच्या या सततच्या त्रासामुळे आणि ब्लॅकमेलिंगमुळे पीडित मुलगी प्रचंड मानसिक दडपणाखाली आली होती.


संशयित आरोपी मनसूर याचे कृत्य दिवसागणिक वाढतच गेल्याने अखेर हा प्रकार पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. आपल्या पोटच्या मुलीसोबत शिक्षकानेच एवढा मोठा गैरप्रकार केल्याचे समजताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ पोलीस ठाणे गाठून नराधम शिक्षकाविरोधात तक्रार नोंदवली.

पोलीस प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपी मनसूर याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ‘पोक्सो’ (POCSO Act) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या नराधमाच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत असून त्याच्या मोबाईलचीही तपासणी केली जात आहे.


ज्ञान देणाऱ्या गुरूनेच जर वासनेच्या अंधारात बुडून आपल्या शिष्याची शिकार करायला सुरुवात केली, तर पालकांनी आपल्या मुलांना कोणाच्या भरवशावर शिकवायचे? हा आजचा सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. नाशिकमधील ही घटना केवळ एका मुलीवरील अन्याय नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला आणि विश्वासाला बसलेला मोठा धक्का आहे. केवळ गुन्हा दाखल करून पोलीस सोपस्कार पूर्ण होणार नाहीत, तर अशा विकृत मानसिकतेच्या मनसूर सारख्या नराधमाला कायद्याचा असा काही ‘शॉक’ मिळाला पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणत्याही शिक्षकाची अशी हिंमत होणार नाही. आता या प्रकरणात पोलीस किती वेगाने तपास करून पीडितेला न्याय मिळवून देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---