---Advertisement---

खुशखबर! तीन हजारांत वार्षिक फास्टॅग, मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

---Advertisement---

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोलप्लाजावरील वाहतुकीची कोंडी तसेच वादविवादाच्या घटना कमी करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी फास्टटॅगची तीन हजार रुपयांच्या वार्षिक पासची ऐतिहासिक अशी योजना आज जाहीर केली.

खाजगी वाहनांसाठी असलेल्या या योजनेचा शुभारंभ १५ ऑगस्ट २०२५ पासून होणार आहे, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, ज्या दिवशीपासून हा पास जारी केला जाईल त्या तारखेपासून एक वर्षापर्यंत वा २०० प्रवासफेन्या यातील जे आधी येईल त्या तारखेपर्यंत हा पास लागू राहणार आहे.

खाजगी वाहनांसाठी एक टोल प्लाजा ओलांडल्यावर प्रवासाची एक फेरी समजली जाणार आहे. ६० किमीच्या आतील टोलप्लाजावरुन वाहनचालकांना दीर्घकाळापासून उदभवणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ही योजना परिणामकारक ठरणार आहे.

असे स्पष्ट करत गडकरी यांनी म्हटले की, या वार्षिक पासमुळे टोलचे पैसे वाहनधारकांना सहजपणे देता येणार आहे. गैरव्यावसायिक वाहनांसाठी म्हणजे कार, जीप आणि व्हॅनसाठी ही पोजना लागू राहणार आहे. या नव्या योजनेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

  • १५ ऑगस्ट २०२५ पासून योजना लागू
  • कार, जीप, व्हॅन या खासगी वाहनांसाठी योजना
  • प्रत्येक टोलवरून येणे-जाणे एक फेरी मानली जाईल
  • २०० फेन्या पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रिचार्ज मारावा लागेल
  • ही योजना राष्ट्रीय
  • महामार्गावर लागू होईल आता टोलवर वाहनाला थांबण्याची गरज नाही

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---