कुटुंबातील सदस्य शेतात, यास्मिनला अचानक काही तरी चावल्यासारखं झालं अन्… घटनेनं हळहळ

जळगाव/पाचोरा : घरात कामात असताना सर्पदंश होवून अत्यवस्थ झालेल्या बालिकेचा मृत्यू झाला. शनिवारी ( २१ जून) सकाळी ही घटना लासगाव (ता. पाचोरा) येथे घडली. यास्मिन शेख बाबू (वय १३, रा. लासगाव, ता.पाचोरा) असे मयत मुलीचे नाव आहे.

शेख बाबू तडवी कुटुंब लासगाव येथे वास्तव्यास आहे. शनिवारी सकाळी कुटुंबातील सदस्य शेतात कामात होते. मुलगी यास्मिन शेताजवळील घरी होती. कपडे धुवून ते अंगणात दोरीवर ती टाकत होती. त्याचवेळी विषारी सापाने तिला दंश केला. विषाबाधा होऊन ती जमिनीवर कोसळली. हा प्रकार कळताच कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत यास्मिन हिला त्वरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषीत केले. ही वार्ता कळताच कुटुंबातील सदस्यांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे लासगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

खबरदारी आवश्यक


पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साप आढळून येतात. सर्पदंश होऊ नये, यासाठी शेतशिवारात नेहमी सतर्कता घ्यायला हवी. रात्री अंधाऱ्यात बाहेर पडताना नेहमी बॅटरीचा वापर करावा, पायात बूट हातात काठीचा आवाज करुन पाय पुढे टाकावेत. बूट घालुन बालक घराबाहेर पडतील, याचीही पालकांनी काळजी घ्यायला हवी. यामुळे जीवनाला सुरक्षितता लाभू शकेल.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment