फैजपूरात नवीन पाईपलाईन जोडणीवरून वाद; नागरिकांकडून २,५०० रुपयांची वसुली केल्याचा आरोप, चौकशीसह पैसे परत करण्याची मागणी…!

---Advertisement---

 

फैजपूर शहरातील वार्ड क्रमांक १ (अ) तहा नगर परिसरातील नागरिकांनी नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन जोडणीसाठी प्रति नळ कनेक्शनधारकाकडून २ हजार ५०० रुपये वसूल करण्यात येत असल्याचा आरोप करत नगरपालिका प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे.

परिसरात पूर्वी २ इंची पाईपलाईन होती. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन नगरपालिकेमार्फत ४ इंची नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र नवीन पाईपलाईनवर जुनी नळ कनेक्शने जोडण्यासाठी नागरिकांकडून प्रत्येकी २ हजार ५०० रुपये आकारले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

फैजपूरच्या नागरिकांचे म्हणणे आहे की, ते जुने नळ कनेक्शनधारक असून पाईपलाईन बदलण्याचे काम हे नगरपालिकेचे आहे. त्यामुळे या कामाचा आर्थिक भार नागरिकांवर टाकणे अन्यायकारक आहे. काही नागरिकांनी दबावाखाली संबंधित रक्कम भरल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मुस्तकीम खान सलीम खान मणियार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच जुनी कनेक्शने कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता नवीन पाईपलाईनला जोडण्यात यावीत आणि ज्या नागरिकांकडून रक्कम वसूल करण्यात आली आहे त्यांना ती परत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांवर योग्य कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---