प्रथमच भारत इराणच्या पाठीशी अमेरिकेला धक्का भारताची स्पष्ट भूमिका; सैन्य पाठवण्यास नकार, चर्चेवर भर..!

---Advertisement---

 

मध्य पूर्वेतील अमेरिका इराण युद्धमुळे वाढत्या तणावात स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील जहाज वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाढत्या तणावाचा परिणाम जगातील भरपूर देशांना बसत आहे या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये 19 जून रोजी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. फ्रान्स तर्फे कतार, इजिप्त, सौदी अरेबिया, युएई यादेशांना आमंत्रण देण्यात आले आहे . या बैठकीत भारतासह अमेरिका देखील सहभागी होणार आहेत.

स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी काही देशांच्या संयुक्त सैन्य तैनातीचा प्रस्ताव चर्चेत आहे. भारताने देखील आपले सैन्य स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी पाठवावे या साठी अमेरिकेकडून दबाव निर्माण केला जात असून भारताने मात्र या संदर्भात आधीच आपली भूमिका स्पष्ट करत सैन्य पाठवण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. भारताने अशा समस्यांवर लष्करी कारवाईपेक्षा संवाद आणि चर्चेतून मार्ग काढण्यावर भर दिला आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुज हा जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग मानला जातो. त्यामुळे या मार्गावरील परिस्थितीकडे जगभरातील देशांचे लक्ष लागले आहे. फ्रान्समध्ये होणाऱ्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---