भोंदू अशोक खरातची वाट लागणार; लैंगिक शोषण व फसवणूक प्रकरणात उज्ज्वल निकम यांची एन्ट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय…!

---Advertisement---

 

अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि चमत्कारांच्या नावाखाली महिलांचे कथित लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता मोठी घडामोड झाली आहे. या बहुचर्चित प्रकरणाच्या न्यायालयीन लढाईत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मदतीसाठी अहिल्यानगरचे अनुभवी फौजदारी वकील परिमल फळे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरणातील खटल्याला अधिक धार प्राप्त झाली असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता या सुनावणीकडे लागले आहे.

सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी निकम-फळे या जोडीवर सोपविण्यात आली आहे. यापूर्वीही अनेक गाजलेल्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये या दोघांनी एकत्रितपणे काम केले आहे. राहुरीतील आढाव वकील दाम्पत्य हत्या प्रकरण, नेवासे येथील रियाज पठाण हत्या प्रकरण तसेच रेखा जरे खून प्रकरणासारख्या संवेदनशील खटल्यांमध्ये त्यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली होती.

अशोक खरात सध्या कोठडीत असून त्याच्याविरोधातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. राज्य सरकारने या प्रकरणासाठी अनुभवी विधिज्ञांची नियुक्ती केल्याने खटल्याच्या पुढील सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता या प्रकरणात न्यायालयात कोणत्या घडामोडी घडतात आणि पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---