जळगाव : दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या मुलाचा पित्यानेच काटा काढला. हा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील कसबा पिंप्री येथे उघडकीस आला आहे. शुभम सुरडकर (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी पित्याला अटक करण्यात आली असून, फत्तेपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम हा सतत दारू पिऊन त्रास देत होता. त्याच्या या रोजच्या त्रासाला संपूर्ण कुटुंब कंटाळले होते. २१ रोजी शुभम घरात झोपला असताना वडील धनराज सुरडकर यांनी शुभमच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. मृतदेह गावापासून एक कि.मी. अंतरावर रस्त्याच्या कडेला आणून टाकला. या प्रकरणी आरोपी पित्याला अटक करण्यात आली असून, फत्तेपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहराळा येथील बेपत्ता तरुणाचा खून, खूनी निलंबीत पोलिस हा आत्याचा पती
यावल तालुक्यातील मोहराळा येथील रहिवासी साहिल शब्बीर तडवी हा तरुण १६ जूनपासून बेपत्ता होता. यावल पोलिस ठाण्यात याबाबत हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. दरम्यान, २० जून रोजी वड्री गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.
याप्रकरणी, निलंबित पोलिस कर्मचारी तथा मृतकाच्या सख्ख्या आत्याचा पती अय्युब हसन तडवी याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने या तरुणाला विहिरीत ढकलल्याची कबुली दिली आहे. यावल पोलिसांनी रविवारी संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.