ST मध्ये सवलतीत प्रवासासाठी 1 ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य; कसे काढायचे? संपूर्ण माहिती एका ठिकाणी

---Advertisement---

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी 1 ऑगस्ट 2026 पासून NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक असणार आहे. कार्ड नसल्यास प्रवाशांकडून पूर्ण भाडे आकारले जाऊ शकते.

राज्यात 4 हजारांहून अधिक नोंदणी आणि वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. एसटी बस डेपो, एसटी नियंत्रण केंद्र, अधिकृत वितरण केंद्रे आणि एजंट या ठिकाणी अर्ज करता येईल.

स्मार्ट कार्ड काढायला महिला व ज्येष्ठ नागत्रिकांना आधार कार्ड, तर विद्यार्थींना सरल क्रमांक, दिव्यांग प्रवासी वैध ओळखपत्र हि कागदपत्रे लागतील.

नवीन NCMC स्मार्ट कार्ड काढण्यासाठी शुल्क 199 रुपये आकारले जाईल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत कार्ड उपलब्ध होईल. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.सवलतीच्या प्रवासासाठी RuPay ON-THE-GO (NCMC) स्मार्ट कार्ड बंधनकारक आहे. कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही. तिकीट कार्डच्या वॉलेटमधून दिले जाईल.



Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---