---Advertisement---
जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर एका अज्ञात तरुणाने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
जयपूर येथील शहीद स्मारक परिसरात कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने विविध सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांवर आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात विद्यार्थी, युवक, पालक आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
अभिजीत दिपके आंदोलनस्थळी पोहोचताच एका अज्ञात तरुणाने अचानक त्यांच्याजवळ येत हल्ला केला. संबंधित तरुणाने त्यांना कानशिलात लगावल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर हल्लेखोराने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारानंतर आंदोलनस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. काही समर्थकांनी संबंधित तरुणाला पकडल्याची माहिती समोर आली. मात्र परिस्थिती चिघळू नये म्हणून अभिजीत दिपके यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोराचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, हे आंदोलन नीट परीक्षा पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर आयोजित करण्यात आले होते. मोठ्या गर्दीमुळे काही नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. सध्या पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून हल्लेखोराला लवकरच ताब्यात घेतले जाईल, असं संगणयत आल आहे.









