---Advertisement---
पाचोरा : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी महावितरणच्या पोलवर बेकायदेशीर बॅनरचे फलक झळकत असून अशा बॅनरधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील विविध ठिकाणी उभे असलेल्या महावितरणच्या पोलवर अनेक दिवसांपासून अनधिकृतरित्या सर्रासपणे बॅनर लावले जात आहे. याकडे संबंधितांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पोलवर कुठलीही परवानगी न घेता बॅनर लावले जात आहेत. महावितरणची किंवा नगरपालिका, पोलीस स्टेशन यांची परवानगी न घेता बॅनर लावले जातात आहेत. या पोलवरील अनधिकृत बॅनरमुळे दुर्घटना देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---Advertisement---
मागील काही दिवसांपूर्वी असेच उल्हास टॉकीज जवळील महावितरणच्या एका महावितरणच्या पोलवर लावलेली बॅनरची फ्रेम भरदिवसा एका महिलेच्या डोक्यावर पडून अपघात झाला होता. या अपघातात ही महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण थेट पाचोरा पोलीस स्टेशन येथे पोहोचले होते. मात्र, सामोपचाराने वाद मिटविण्यात आला होता.
या परिसरात अनधिकृत बॅनरचे फुटले पेव
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, भुयारी मार्गांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर, भडगाव रोड याठिकाणी पोलवर बॅनरचे फलक झळकताना दिसून येत आहेत. पोलवर बॅनर लावणाऱ्यावर व बॅनरधारकांवर विद्रुपीकरण कायदा अंतर्गत पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता संबंधित अधिकारी अशा बॅनरधारकांवर व लावणाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.