---Advertisement---

रसलपुरात ५५ किलो गोवंश गोवंश मांस जप्त, रावेर पोलिसांच्या कारवाईत एकास अटक

---Advertisement---

रावेर तालुक्यातील रसलपूर येथे पोलिसांनी सुमारे ५५ किलो गोवंश जातीचे मांस जप्त केले आहे . या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना गुप्त माहिती मिळाली की रसलपूर येथे गोवंश मांस विक्री होत असल्याची माहिती मिळाली.

यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांच्यासह पोलिस पथकाला कारवाईचे निर्देश दिले. या पथकाने कुरेशी मोहल्यात जाऊन खात्री केली असता शेख हुसेन शेख हसन व शेख इसाक शेख बशीर हे गोवंशास अवैधरित्या मारून गोमास बाळगून विक्री करीत असतांना आढळून आले.

याबाबत पशु वैद्यकिय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांनी तपासणी करून ते गोमास असल्याचे सांगितले. या वरून पोलीस कॉस्टेबल प्रमोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र अधिनियम प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेख हुसेन शेख हसन यास पोलीसांनी अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलीस शिपाई सुकेश तडवी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, विकार शेख, राहूल परदेशी, महिला पोलीस उषा मशाने, भाग्यश्री कांबळे यांच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---