---Advertisement---

Crime News: पुण्यात भोंदू बाबा भक्तांवर ठेवायचा ‘डिजिटल नजर’, मोबाईल अ‍ॅपद्वारे बघायचा नको ते व्हिडिओ  

by team

---Advertisement---

Crime News: पुण्यातील एका भोंदू बाबाने मोबाईल अ‍ॅपद्वारे भक्तांच्या खासगी आयुष्यावर लक्ष ठेऊन त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बावधन पोलिसांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार त्यांनी भोंदू बाबाला अटक केली आहे.

पुण्यातील एका भक्ताच्या मोबाईलमध्ये या भोदूबाबाने हिडन कॅमेराद्वारे खाजगी आयुष्यावर नजर ठेवत त्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं या भोंदू बाबाचं नाव असून, तो स्वतःकडे ‘दिव्यशक्ती’ असल्याचा दावा करून भक्तांची फसवणूक करत होता.

या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, या भोंदू बाबाने त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याच भासवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. बाबाने फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक हिडन ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवला. त्यानंतर भक्तांचा मोबाईल आपल्या फोनवर अॅक्सेस करून त्यांच्या खासगी आयुष्यावर लक्ष ठेवायचा. एवढेच नाही तर फिर्यादीला अश्लील कृत्य, त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडले आणि मोबाईल ॲपद्वारे ते पाहिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे. 

याप्रकरणी बावधन पोलिसांनी प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार याला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात बाबाच्या मोबाईलमध्ये गुप्त रेकॉर्डिंग करणारे अ‍ॅप आणि काही व्हिडिओ क्लिप्स सापडल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोंदूबाबाने एक ‘हिडन कॅमेरा अ‍ॅप’ मोबाईलमध्ये इंस्टॉल केलं होतं. या अ‍ॅपद्वारे तो आपल्या भक्तांच्या हालचाली, संभाषणं आणि कृती चोरून रेकॉर्ड करत होता. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---