---Advertisement---

वेतन वाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी 108 अॅम्बुलन्स वाहन चालक युनियनतर्फे आंदोलन

---Advertisement---

जळगाव : राज्यातील 108 अॅम्बुलन्स वाहन चालकांनी गेल्या अनेक वर्षांपासून अल्प वेतनावर अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार आणि सेवा पुरवठादार दोघांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला आहे. आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास १ जुलैपासून संपावर जाऊन १०८ रुग्णवाहिका चालक युनियनतर्फे इशारा देण्यात आला.

108 रुग्णवाहिका चालक संघटनेच्या वतीने जिल्हा रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात आली. रुग्णवाहिका चालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हे निदर्शने करून रुग्णवाहिका चालकांनी शासनाची व प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान सेवाकाळ आठ तासांचा करावा, वेतन मध्ये असलेली तफावत दूर करावी व 2014 ते 2017 मधील प्रलंबित असलेली पीएफची रक्कम त्वरित मिळावी यासह विविध मागण्यांसाठी हे निदर्शने करण्यात आले. मागण्या पूर्ण झाल्यास पुढील काळात काम बंद आंदोलन छेडण्याचा रुग्णवाहिका त्याला संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला.

---Advertisement---

निवेदनात तातडीने सेवा पुरवठादार यांच्याबरोबर संघटनेची संयुक्त बैठक बोलावून त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय करावा अशी आपणास विनंती आहे. ३० जून पर्यंत त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास १ जुलै २०२५ पासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

सरकारची ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न 108 वाहन चालक करीत आहेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून गेले अनेक वर्ष मागण्या प्रलंबित असतानाही काम सुरू ठेवले आहे. परंतु आता आपणही आणि सेवा पुरवठादार दोघेही या मागण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे काम बंद आंदोलन याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आमच्यासमोर राहिलेला नाही. आपण मागण्याबाबत तातडीने हस्तक्षेप कराल अशी अपेक्षा आहे
सोबत मागण्यांचे निवेदन जोडले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---