---Advertisement---

Jalgaon News : ‘या’ तारखेपर्यंत पाऊस घेणार ‘ब्रेक’, हवामान विभागाचा अंदाज

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने बऱ्याच भागात दिलासा दिला आहे. सुरुवातीच्या या सरींमुळे शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाले असले तरी, आता पुढील आठवडाभर पावसाची उघडीप राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे, दमदार पाऊस आता ७ जुलैनंतर होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

---Advertisement---

येत्या आठवडाभर जिल्ह्यात काही अंशी ढगाळ वातावरण राहील, तसेच तुरळक किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस ठराविक तालुक्यांमध्ये होऊ शकतो. मात्र, दमदार पावसाची शक्यता आठवडाभर तरी नाही. ७ जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊन दमदार पाऊस होऊ शकतो. दरम्यान, जिल्ह्यात जून महिन्याच्या पावसाची सरासरी गाठली गेली असून, जून महिन्यात जिल्ह्यात १२३ मिमी पाऊस होत असतो. त्याचप्रमाणे २८ जूनपर्यंत जिल्ह्यात १२१ मिमी पाऊस झाला होता. त्यात काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. तर रावेर, यावल, चोपडा, धरणगाव, अमळनेर या तालुक्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. या भागातील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत आणि पेरणीची कामे थांबलेली आहेत.

आगामी पाच दिवस अशी राहणार वातावरणाची स्थिती

३० जून, मुख्यतः ढगाळ वातावरण तुरळक पाऊस

१ जुलै, मुख्यतः ढगाळ वातावरण

२ जुलै, ढगाळ वातावरण व वाऱ्यांचा वेग १५ ते २० किमीपर्यंत असणार

३ जुलै, काही अंशी ढगाळ वातावरण, तुरळक पावसाचा अंदाज

४ जुलै, मुख्यतः ढगाळ वातावरण तुरळक पाऊस

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---