श्री चॅरिटेबलचा उपक्रम ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

---Advertisement---

 

शिरसोली : येथील बारी समाज विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील होतकरु व गुणवंत अशा ३ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या सहकार्याने पार पडला.

याप्रसंगी ना.गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना सांगितले की,’वह्या व लेखन साहित्य वितरण करतांना विद्यार्थ्यांना केंद्रभूत ठेवले आहे. साहित्य वाटप करतांना विद्यार्थ्यांचे पालक कुठल्या पक्षाचे किंवा धर्माचे आहे हे बघितले नाही. प्रत्येक विद्यार्थी हा आपला आहे ही धारणा मनात ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टींची पूर्तता करण्याचा प्रयत्न करू’, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

श्री चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष शाम कोगटा यांनी आभार मानतांना सांगितले की, ना.गुलाबराव पाटील व अशोक जैन यांच्या अनमोल सहकार्याने मोफत वह्या व लेखन साहित्य वाटपाचा कार्यक्रम राबविणे संस्थेला शक्य होत असते. गेल्या ३३ वर्षापासून अखंडित वह्या व लेखन साहित्य वाटपाचा कार्यक्रम संस्था करीत आहे आणि यापुढे देखील हा वितरण सोहळा असाच चालू राहील हे देखील सांगितले.

वह्या व लेखन साहित्य वितरण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोपाल चौधरी, शाम कोगटा, माजी नगरसेवक मनोज चौधरी, योगेश कलंत्री, अनिल पाटील, भगवान पाटील, अनिल पाटील, बापू मराठे ,शरद कोळी आदी उपस्थित होते. विजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वितेसाठी युवासेना महानगर उपाध्यक्ष पवन ठाकूर, बबन धनगर,अविनाश पाटील, निरज वाणी, रमेश माळी, प्रविण बिऱ्हाडे, रोहित गोसावी, विजय यादव, प्रशांत ठाकरे, कैलास ठाकरे, मानस तळेले, निलेश बारी, विक्की बारी, ओम महांगडे, जीवन कोळी यांनी परिश्रम घेतले. वितरण सोहळ्यासाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---