---Advertisement---
जळगाव : गोमासांची हाडे प्लॅस्टीकच्या गोण्यांमध्ये भरुन त्याची चोरटी वाहतूक केली जात होती. प्लॅस्टीकच्या गोण्यांमध्ये एकूण १३ क्विंटल मासांची हाडे भरलेले आढळुन आली. सर्व मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी तिघांवर अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शुक्रवारी (२७ जून) दुपारी धानोरा-यावल रोडने बोलेरो पिकअप (एमएच १७ बीवाय ६६६३) जात होती. धानोरा बसस्टॅन्डजवळ वाहनातून मासं हाडे विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचा प्रकार समोर आला.
या प्रकरणी तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार शेख नाशिर शेख म हेबुब (रा.जेस्ट मयेरियाब हाणपूर म.प्र.), सैय्यद अशपाक सैय्यद, बिलाल सैय्यद (दोन्ही रा.यावल) यांच्यावर अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार जयदीप राजपूत हे तपास करीत आहेत.
असा मिळाला मुद्देमाल
९ हजार १०० रुपये किंमतीच्या एकूण ४० प्लॅस्टीकच्या गोण्यांमध्ये १३ क्विंटल मासांची हाडे, तीन लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण सुमारे ३ लाख ९ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना मिळाला. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी जावून प्रकार जाणून घेतला.