---Advertisement---
जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत रेल्वे संरक्षण दल अर्थात आरपीएफ जवानांनी ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत १०७ हरवलेल्या वा घरातून पलायन केलेल्या म लांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. तसेच रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेत चढताना आपदाप्रसंगी ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत राज्यातील मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे, सोलापूर आदि सादि विभागात गेल्या दोन वर्षात १९ जणांचा जीव वाचवून खरे हिरो म्हणून उदयास आले असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
ऑपरेशन नन्हे फरिश्ते
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत घरातून हरवलेली तसेच पळून गेलेली मुले रेल्वे स्थानक वा फलाटावर घाबरलेल्या अवस्थेत आरपीएफ जवानांना आढळून आली. रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या आरपीएफ अधिकारी कर्मचाऱ्यांनी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत हरवलेल्या तसेच पळून आलेल्या मुलांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांच्या कुटुंबियांकडे या मुलांना सोपविण्याच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत आरपीएफने सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी), इतर आघाडीच्या रेल्वे कर्मचारी आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने एप्रिल ते मे-२०२४ या कालावधीत ४५, तसेच २०२५ दरम्यान ६२ असे एकूण १०७मुलांना वाचवले आहे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविले आहे.
ऑपरेशन जीवन रक्षा
आरपीएफ कर्मचारी नेहमीच रेल्वे मालमत्तेसह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास जागरूक राहण्यात आघाडीवर आहेत. अनेक वेळा जीव वाचवणाऱ्यांची भूमिकाही बजावली आहे. मध्य रेल्वे आरपीएफ कर्मचाऱ्यांनी राज्यातील विविध विभागातील स्थानकांवर एप्रिल-मे २०२५ दरम्यान ‘ऑपरेशन जीवन रक्षा’ अंतर्गत १२ व्यक्तीत यात ९ पुरुष आणि ३ महिलांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तर गेल्या वर्षी २०२४ मध्ये याच काळात ७ व्यक्तीत ५ पुरुष आणि २ महिलांचे प्राण वाचवण्यात आले.
जळगाव येथून १६ जणांना केले पालकांच्या स्वाधीन जळगाव रेल्वे स्थानकांतर्गत ऑपरेशन नन्हे फरिश्तेअंतर्गत जानेवारी ते डिसेंबर २०२४ दरम्यान ८ मुले व ४ मुली असे १२ तर जून २०२५ दरम्यान ५ मुले आणि २ मुली असे ७ जण जळगाव फलाटावर आरपीएफ कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्या मुलांच्या पालकांचा शोध घेत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
– अमित यादव पोलीस निरीक्षक आरपीएफ जळगाव
बहुतेक प्रकरणांमध्ये सतर्क आरपीएफने अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत जे बहुतांशवेळा निष्काळजीपणे आणि चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या अथवा उतरताना धोक्याचा सामना करतात. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी सम र्पण, दक्षता आणि धैर्याने आपले कर्तव्य बजावले आहे. – इति पांडेय, मध्य रेल्वे मंडळ प्रबंधक, भुसावळ