---Advertisement---
जळगाव : सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाकडून अल्पदरात घरांची सोडत काढण्यात येत असते. ‘म्हाडा’च्या घरांचा तिसरा प्रकल्प लवकरच जळगाव साकारत आहे. हा प्रकल्प शहरातील ममुराबाद येथे राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाला महापालिकेच्या नगररचना विभागातून लवकरच अंतीम मंजूरी दिली जाणार आहे.
शहरातील ममुराबाद रस्त्यावर महापालिकेच्या हद्दीत गट क्रमाकं ४२० आणि ४२१ मध्ये हा प्रकल्प साकारणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्च २०२५ मध्ये या जागेला मंजूरी दिली आहे. तब्बल ३१०० स्कवेअरफुट ही जागा आहे.
---Advertisement---
त्यात ९ हजार १७७ स्वेअरफुट बांधकाम होणार आहे. सहा मजली इमारत असून त्यात १४४ फ्लॅट असतील तर २५ दुकाने असणार आहेत. जळगावातील म्हाडाचे यापूर्वी घरांचे दोन प्रकल्प झालेले आहेत. एक प्रकल्प एमआयडीसीत तर दुसरा प्रकल्प अमळनेर रेल्वे चौकीजवळ एस.एम.आय.टी. कॉलेज जवळ उभारण्यात आला आहे.
आता बऱ्याच वर्षानंतर हा तिसरा प्रकल्प होत आहे. महापालिकेतर्फे ११ जून २०२५ रोजी अग्नीशमन विभागाने या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. आता नगररचना सहाय्यक संचालक या प्रस्तावाची स्कुटनी करून त्याला अंतीम मंजूरी देण्यार आहेत. मुंबई येथील आर्किटेक्ट सलोनी देवधर यांनी हा बांधकामाचा प्रस्ताव दिला आहे. शासनाच्या ‘म्हाडा’चा हा प्रकल्प झाल्यास जळगावातील नागरीकांना माफक किमंतीत घरे मिळणार आहेत. यामुळे घराच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील.