---Advertisement---
जळगाव : राज्य शासनातर्फे महिलांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवत आहे. अशाच प्रकारे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून दोन वर्षात ७ हजार ७२४ लाभार्थ्यांना ३ कोटी ८६ लाख २० हजारांचे अनुदान त्यांच्या खात्यावर थेट वितरीत करण्यात आले आहे.
राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना म्हणून लेक लाडकी योजनेकडे पहिले जाते. जिल्ह्यात लेक लाडकी योजनेचे सन २०२३-२४ मध्ये हजार तर सन २०२४-२५ मध्ये ६ हजार ७२४ लाभार्थ्यांना अनुदान थेट त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यंदाही जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे १ हजार ८०० अर्ज प्राप्त झाले आहेत.
---Advertisement---
त्यांना मंजूरी देण्यात आली आहे. यातील ६१६ अर्ज त्रुटी पूर्तता करण्यासाठी परत पाठविण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून प्रथम मुलीसाठी शासनाकडून या याजनेच्या माध्यमातून पहिला हप्ता ५ हजारांचा देण्यात येतो. त्यानंतर मुलींवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया केल्यानंतर त्यांना दुसरा हप्ताही वर्ग करण्यात येतो.
लेक लाडकी योजना ही शासनाची महत्वाची योजना आहे. दरवर्षी शासनाच्या योजनेसाठी निधी जिल्हा परिषदेला मिळतो. जिल्हाभरातून ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची तापसणी करून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
– हेमंत भदाणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण, जि.प. जळगाव