---Advertisement---

निंबादेवी धरणात बेपत्ता तरुणाचा अखेर आढळला मृतदेह

---Advertisement---

जळगाव : यावल तालुक्यातील सावखेडासिमजवळील निंबादेवी धरणात रविवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या जळगाव येथील जतीन अतुल वारडे (वय १८) या तरुणाचा अखेर तिसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आला आहे.

रामेश्वर कॉलनीतील जतीन हा आपल्या सात मित्रांसह रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी दुचाकीने निंबादेवी धरणावर आला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जतीन अचानक खोल पाण्यात गेल्याने बुडाला. तेंव्हापासून तो बेपत्ता होता.

---Advertisement---

सोमवारी सकाळपासून पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वात सावखेडासिम पोलिस पाटील पंकज बडगुजर, सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार वासुदेव मराठे, अर्षद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी आणि संतोष पाटील यांच्या पथकाने दिवसभर धरणावर तळ ठोकला. स्थानिक तीन तरुण आणि मारुळ येथील एका वृद्धाच्या मदतीने पाण्यात शोध घेण्यात आला, परंतु सायंकाळपर्यंत जतीन हाती लागला नव्हता. त्यानंतर आज मंगळवारी धुळे येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले.

तिसऱ्या दिवशी आढळला मृतदेह

अखेर तिसऱ्या दिवशी जतीनचा मृतदेह आढळून आला आहे. यावल पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---