---Advertisement---
जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे ३० जून रोजी, बफर साठ्यातून ३ हजार मेट्रीक टन युरीया व ४२० में टन डीएपी वितरीत करण्यात आला आहे. हा साठा मेडसी या यंत्रणेद्वारे पुर्ण जिल्ह्यात वितरीत करण्यात येत आहे. हा साठा १०० टक्के लिकींग शिवाय वितरीत करण्यात आला आहे. २ जुलैपर्यंत तीन दिवसात ९ हजार ४०० मे.टन युरीया वितरीत करण्यात येणार आहे.
---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात ३० जून रोजी आयपीएल कंपनीचा १ हजार टन युरीया तर एचयुआरएल कंपनीचा २ हजार ६०० मे टन युरीया १ जूलै रोजी वितरीत झाला आहे. २ जुलै रोजी सीआरएफ कंपनीचा २ हजार ६०० मे टन युरीया वितरीत होत आहे. अशा पद्धतीने ३० जुन ते २ जुलै या तीन दिवसांत सुमारे ९ हजार ४०० मे टन युरीया जिल्ह्यात वितरीत करण्यात आला आहे.
विशेष हा सर्व युरीया १०० टक्के विना लीकींग पद्धतीने किरकोळ खत विक्रेत्यांपर्यंत पोहोच झालेला आहे. शेतकऱ्यांना देखील त्याच पद्धतीने सहज लिंकींग शिवाय उपलब्ध असणार होईल, याची खात्री कृषी विभागाने केलेली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी युरीया अनुपलब्धता अथवा या अनुषंगाने तर काही तक्रार असल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्ष ९३०७०७६१०७ या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करुन अथवा फोन करुन आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन केले आहे.