---Advertisement---

महावितरणचा भोंगळ कारभार ; दोन महिन्यांपासून विद्युत खांब पडलेला, पाण्यासाठी वणवण !

---Advertisement---

Electricity pole धरणगाव : शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय सध्या धरणगावाच्या शेतकऱ्यांना येत आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्याने शेतातील पावसात पडलेला खांब व तुटलेल्या तारांची अद्याप दुरुस्ती महावितरणकडून करण्यात आलेली नाही. यामुळे गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना व जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून शेतकऱ्याला जोडणी करुन देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

---Advertisement---

धरणगाव शहरालगतच्या मोठा माळीवाडा परिसरातील जीवन बाबा मंदिरावर असलेला एक विद्युत खांब गेल्या दोन महिन्यांपासून पडलेला असल्याने शेतकऱ्यांमध्ये महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही कर्मचारी आणि अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या विद्युत खांबावरून तीन कनेक्शन जोडलेली होती. संबंधित कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी इतर दोन कनेक्शनधारकांकडून पैसे घेऊन त्यांची जोडणी करून दिली, मात्र, शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पीडित शेतकऱ्याने सांगितले की, त्यांनी संबंधित वायरमनला पाच-सहा वेळा फोन केले, तसेच कार्यालयात जाऊन राजेंद्र पाटील यांच्याकडे दोनदा तक्रार दिली. कार्यकारी अभियंता सोनगिरे यांच्याकडेही एकदा तक्रार देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही किंवा जोडणी झालेली नाही. हा भाग गावाजवळ असल्याने अनेक नागरिक पाणी भरण्यासाठी येत असतात. परंतु विद्युत कनेक्शन नसल्यामुळे पाण्याची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांनाही पाण्यासाठी दूरपर्यंत जावे लागत आहे. शेतकऱ्यांनी आता प्रश्न विचारला आहे की, महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी आता तरी या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का? या प्रकरणी तातडीने लक्ष घालून पडलेला विद्युत खांब दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---