---Advertisement---
जळगाव : आयुष्यमान भारत योजना लाभप्राप्त दवाखान्यांची यादी ग्रामस्तरावर गरजुंना मिळावी याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी अभिनव उपक्रम हाती घेलता आहे. या उपक्रमांतर्गंत ही यादी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर लावण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. यामुळे गरजुंना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे.
आयुष्यमान भारत योजना या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील १ हजार १५९ ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभ उपलब्ध असलेल्या ९० दवाखान्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे गावपातळीवर नागरिकांना सहजपणे माहिती मिळणार आहे. यामुळे या योजना लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल ह्या जातीने या मोहिमेचा नियमित आढावा घेत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून यादी नोटीस बोर्डवर चिकटविल्याचे छायाचित्र मागवून खात्री केली जात आहे.
---Advertisement---
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या परिसरातील आयुष्यमान भारत लाभप्राप्त दवाखान्यांची माहिती मिळणार आहे. तसेच विविध आजारांवर मोफत व सुलभ उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम म्हणजे शासनाच्या आरोग्य सेवांचा खरा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.
देशातील गरीब व गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार रुग्णालयीन सेवा पुरवणे, ही उद्दिष्ट आहे. भारतातील सुमारे १० कोटी कुटुंबे (५० कोटी नागरिक) या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. महाराष्ट्रातही ही योजना राबवली जात आहे.
योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये : दरवर्षी रु. 5 लाखांपर्यंत मोफत रुग्णालयीन उपचार – एका कुटुंबासाठी., सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा. 1 हजार 350 पेक्षा जास्त रोगांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. उदाहरणार्थ हृदयरोग, कॅन्सर, मूत्रपिंड विकार, अपघाती उपचार आदी आजारांचा यात समावेश आहे. या योजनेत कॅशलेस आणि पेपरलेस प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गंत उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्यापूर्वी व नंतरची देखील सेवा मिळणार आहे. ई-कार्डद्वारे ओळख लाभार्थीला आधार कार्ड/ राशन कार्ड द्वारे ओळखले जाते.
योजना लाभ मिळवण्यासाठी काय करावे? जवळच्या सेवा केंद्रावर (CSC) किंवा आरोग्य सहाय्यक केंद्रात जाऊन नाव तपासावे. पात्र असल्यास आयुष्मान भारत कार्ड तयार करून घ्यावे. लाभार्थी रुग्णालयात दाखल झाल्यास कॅशलेस सेवा मिळू शकते.
महाराष्ट्रात ही योजना “महात्मा फुले जन आरोग्य योजना” याच्यासोबत एकत्रितपणे राबवली जाते. त्यामुळे राज्यातील नागरिकांना दोन्ही योजनांचे लाभ मिळू शकतात.