---Advertisement---
भुसावळ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर स्वच्छ आणि अडथळाविरहित ठेवण्याच्या दृष्टीने भुसावळ नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत आठवडे बाजार परिसरासह जैन मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.
---Advertisement---
या मोहिमेपूर्वी अतिक्रमणधारकांना स्वयंप्रेरणेने अतिक्रमण हटविण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र,ठोस प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात करण्यात आली. यावेळी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ,उपमुख्य अधिकारी शेख परवेज अहमद,नगर अभियंता पंकज मदगे, आस्थापना प्रमुख वैभव पवार,रचना सहायक अंकुश गोसावी,प्रशासकीय अधिकारी अनिल आहुजा,अजित भट,दीपक अहिरे,महेश चौधरी यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आठवडे बाजार परिसरात रस्त्यावर ठेवण्यात आलेले ठेले, फळ आणि अनधिकृत व्यवसाय हटविण्यात आले.या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली असून, नागरिकांनी या पावलाचे स्वागत केले आहे. नगरपालिकेच्या वतीने असेच नियोजन शहराच्या इतर भागातही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.