---Advertisement---
जळगाव : प्रतिपंढरपूर समजल्या जाणाया पिप्राळा येथील रथोत्सवाला १२५ वर्षांची परंपरा लाभली आहे रविवारी ( ६ जुलै) रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी रथोत्सवाला १५० वर्ष पूर्ण होत आहे. मंदिर व रथ रंगरंगोटीसह विविध कामे पूर्ण झाली आहे. रथोत्सवासाठी रथ सज्ज झाला आहे. भक्तीमय व उल्हासपूर्ण वातावरणात रथोत्सव साजरा करण्यासाठी विठ्ठल मंदिर संस्थान परिश्रम घेत आहे
रविवारी (६ जुलै ) रोजी सकाळी ५ वाजता समृद्धी व ऋग्वेद मिलिंद जुनागडे यांच्या हस्ते महापूजा होईल. ७ वाजता पंअलका व सुनील प्रभाकर वाणी, रुपाली व भगवान हिरालाल वाणी, विणा व दीपक गोपाल वाणी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येईल यंदा रथाच्या महापूजेचा मान मंदिर संस्थान अध्यक्ष मोहनदास पुरुषोत्तम वाणी व सौरभ रमेश वाणी यांना मिळाला आहे त्यांच्याहस्ते सपत्नीक दुपारी ११. ३० वाजता रथाची महापूजा करण्यात येईल.
---Advertisement---
दुपारी १२ वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते महाआरती करण्यात येणार आहे रथोत्सवाच्या महापूजेप्रसंगी माजी मंत्री सुरेशदादा जैन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, दूध संघांचे संचालक अरविंद देशमुख , जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, माजी पोलीस पाटील विष्णू पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
रथोत्सवाची कार्यकारिणी
रथोत्सवासाठी यशस्वितेसाठी विठ्ठल मंदिर संस्थान कार्यकारिणीतील सदस्य, माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, मयूर कापसे, विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, दीपक बारी, परशुराम सोमाणी, पंकज सोमाणी, शक्ती महाजन, माजी नागरसेविका प्रतिभा कापसे, शोभा बारी व पिंप्राळा नगरीचे ग्रामस्थ परिश्रम घेत असतात. यात अध्यक्ष मोहनदास वाणी, उपाध्यक्ष पंढरीनाथ वाणी, चिटणीस अशोक वाणी, सहचिटणीस प्रमोद वाणी, सदस्य संजय वाणी, योगेश वाणी, सुनील वाणी, रामदास वाणी यांचा समावेश आहे. भजनी मंडळ, टाळ व भजनी मंडळ, टाळ व मृदंगाच्या गजरात अभंग, गवळणी व भजन करून राधा कृष्णाच्या मूर्ती ११. ३० वाजता रथावर विराजमान होतात यानंतर महापूजा व त्यानंतर महाआरती करण्यात येते. दुपारी १२ वाजता सारथी अर्जुन, हनुमान, गरूड मूर्ती व त्यापुढे घोडे आरूढ होवून रथ सुशोभित केला जातो भजन, गवळणी, अभंग, भक्तीगीतांच्या तालासुरात भक्तीमय वातावरण रथोत्सव साजरा केला जातो.