---Advertisement---

आमोदा येथे मोटरसायकलची समोरासमोर धडक ; दोघे गंभीर जखमी

---Advertisement---

भुसावळ : यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ गेल्या काही दिवसांपासून. लहान मोठे असे 28 अपघात झाले आहेत. अपघाताची मालिका सुरूच आहे. रविवारी (६ जुलै ) सकाळी प्रवाशांनी भरलेली खाजगी बस पुलाचा कठडा तोडून नदी पात्रात पलटली. तर रात्री साडे नऊ वाजता आमोदा गावाजवळ दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

आमोदा येथे रविवारी (६ जुलै) रात्री ९ : १५ वाजेच्या सुमारास भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात फैजपुर येथील एक तरुण बामणोद येथील एक असे दोघे जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातातील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी भुसावळ येथे हलवण्यात आले आहे.

---Advertisement---

तर दुसऱ्याला फैजपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमोदा येथे दुचाकी (एमएच १९, ५६९७) भुसावळकडून येत होती. तर दुसरी दुचाकी (एमएच १९ डीजे ४४२५) ही गाडी फैजपुरकडून बामणोदकडे जात होती. त्यांची समोरासमोर धडक होऊन जमील तडवी (रा. फैजपूर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास भुसावळ येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर दुसरा बामणोद येथील कल्पेश महाजन हा सुद्धा जखमी झालेला असून त्याला फैजपूर येथे दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---