---Advertisement---

काँग्रेसी घराण्यातील दुसऱ्या पिढीला भाजपचा लळा…!

---Advertisement---

चेतन साखरे जळगाव : सव्वाशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाची नेतृत्वाअभावी उत्तर महाराष्ट्रात मोठी वाताहत होताना दिसत आहे जळगाव, धुळे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतील काँग्रेसच्या कट्टर समर्थकांची दुसरी पिढी ही राजकीय पटलावर भाजपाला मोठी पसंती देत आहे. राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वाचा मोठा प्रभाव काँग्रेसमधील दुसन्या पिढीवर दिसून येत असल्याने साहजिकच या पिढीचा कल हा भाजपकडे वाढला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीने राजकारणाची सर्वच समीकरणे बदलली. महायुतीला महाबहुमत मिळाले आणि राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र सरकार स्थापन झाले. २०१४ मध्ये राज्याचे नेतृत्व करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांमधील दुसऱ्या पिढीवर लक्ष केंद्रित केले. राजकारणात डोकी मोजली जातात. त्यामुळे पक्षविस्तार करायचा असेल, तर विरोधकांनाही आपलेसे करून घ्यावे लागते. था तंत्राचा वापर करीत देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय सारीपाटावर आपल्या चाली सुरूच ठेवल्या. विकासात राजकारण नको, या स्वभावामुळे विरोधकही भाजपला प्राधान्य देऊ लागले.


उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस खिळखिळी

एकेकाळी उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा मोठा दबदबा होता. अहिल्यानगर जिल्ह्यात थोरात, विखे घराणे, नंदुरबारमध्ये पाडवी, गावित घराणे, धुळे जिल्ह्यात अमरिशभाई पटेल, (स्व.) रोहिदास पाटील घराणे जळगाव जिल्ह्यात माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील अशा दिग्गजांमुळे काँग्रेसची मोठी ताकद होती. मात्र, २०१४ नंतर काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लागला अन् काँग्रेस खिळखिळी होऊ लागली.

---Advertisement---

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांतीत नेत्यांची रीघ भाजप प्रवेशासाठी लागली. २०१४ मध्ये अहिल्यानगर येथील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांचा मुलगा डॉ सुजय विखे पाटील यांनी भाजपप्रवेश केला. त्यानंतर थोरात कुटुंबाच्या सोयरिकमधील काँग्रेसच्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार राहिलेले डॉ. सुधीर तांबे यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी पदवीधर शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केली. त्यांच्या विजयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा हातभार लावला, तेव्हापासून ते फडणवीसांचे कट्टर समर्थक झाले. नंदुरबार जिल्ह्यात माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

धुळे जिल्ह्यात काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे चिरंजीव अनिकेत पाटीत यांनीही मागील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी हाती भाजपाचे कमळ घेतले. तसेच माजी आमदार (स्व.) द. वा. पाटील यांचे नातू राघवेंद्र ऊर्फ राम भदाणे हे सध्या भाजपचे आमदार आहेत, तसेच नुकताच मुख्यमंत्र्यांच्या तोडीचे नेतृत्व असलेल्या (स्व.) रोहिदास पाटील यांचे चिरंजीव कुणाल बाबा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावरही फडणवीसांचा मोठा प्रभाव असल्याचे त्यांनी एका मुलाखतीतून स्पष्ट केले. शिरपूरचे अनभिषिक्त सम्राट अमरिशभाई पटेल यांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करीत आमदारकी मिळविली जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचे हुकमी एक्के मानले जाणारे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची कन्या डॉ. केतकी पाटील यांनीही भाजपला पसंती देत पक्षात लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रवेश केला. तसेच एकेकाळी काँग्रेसच्या (एस) तिकिटावर निवडणूक लढविलेले माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे यांचे चिरंजीव पराग मोरे आणि त्यांचे बंधू यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

तसेच स्व. बाळासाहेब चौधरी यांच्याही घराण्यातीत तिसरी पिढी ही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. हा सारा घटनाक्रम लक्षात घेतला असता. ज्यांची अख्खी हयात काँग्रेसची सेवा करण्यात गेली, त्यांच्याच दुसऱ्या पिढीने भाजपचा झेंडा हाती धरत ‘जय श्रीराम’चा नारा देत काँग्रेसला अक्षरशः खिळखिळे केले आहे. भाजपचे संघटन, नेतृत्व आणि विकासाचा दृष्टिकोन या त्रिसूत्राचा आधार घेत या दुसऱ्या पिढीने राजकीय सारीपाटावर नवी वात्चात सुरू केली आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजप भक्कम स्थितीत !


राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणान्या उत्तर महाराष्ट्रात जोरदार इनकमिंग सुरू असल्याने भाजप आता भक्कम स्थितीत आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमध्ये झालेली इनकमिंग ही फायदेशीर ठरते की नाही? हे मात्र निवडणुकांनंतरच स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---