---Advertisement---

११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ

---Advertisement---


जळगाव : महाराष्ट्रात यावर्षी पहिल्यांदाच सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्रीभूत प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने १४ लाख विद्यार्थ्यांची अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक प्रचंड संभ्रमावस्थेत आहेत. यासंदर्भात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
यंदा इयत्ता दहावीचे निकाल हे नेहमीपेक्षा लवकर जाहीर होऊन देखील अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये विलंब होताना दिसून येत आहे. दहावीचा निकाल जाहीर झाला, तरी देखील अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर होण्यासाठी २९ जून ही तारीख उजाडली.

केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे उद्दिष्ट विधायक असले तरी प्रत्यक्षात मात्र पुरेशा सोयीसुविधा आणि नियोजनाचा अभाव असल्याने या प्रवेश प्रक्रियेमध्ये विलंब होत आहे. प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी येणे, नियमावलीची स्पष्टता नसणे, सुनियोजित प्राधान्यक्रम प्रणालीची कमतरता, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा अभाव, पुरेशा मार्गदर्शन केंद्रांची अनुपलब्धता अशा विविध समस्या उद्भवल्याने या प्रवेश प्रक्रियेत सतत अडथळे येत आहेत.

---Advertisement---

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र हे सक्तीचे करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे हे प्रमाणपत्र नाही किंवा अर्ज केल्याचे टोकन /अभाविपचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा पावती नाही त्या विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची नामुष्की ओढवणार आहे. या विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार पुढील फेरीमध्ये देखील सहभाग घेता येणार नसून थेट चौथ्या फेरीमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. ग्रामीण भागात पुरेशी माहिती न मिळाल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेले नाही. या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार का? असा प्रश्न आहे.

१० वी चे निकाल यावर्षी लवकर लागून सुद्धा प्रवेश हे लांबणीवर पडणार आहेत. तसेच काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित देखील राहणार आहेत यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राज्यव्यापी आंदोलन करेल असा इशारा अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे यांनी दिला आहे.

अभाविपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री आणि शालेय शिक्षण राज्य मंत्री यांना निवेदनाद्वारे या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी केली आहे. तसेच पहिल्या फेरीच्या प्रवेशाची अंतिम तारीख ही तीन दिवसांनी वाढविण्यात यावी, नॉन क्रिमीलेयरच्या हमीपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावे, तसेच दिलेली हेल्पलाइन ही सक्षम करण्यात यावी व ही प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ठिकठिकाणी मार्गदर्शन केंद्रांची उभारणी करण्यात यावी अशा विविध मागण्या शासनाकडे केल्या आहेत. कुठल्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यास अभाविप शालेय शिक्षण विभागाविरोधात आक्रमक आंदोलन करेल असा इशारा देखील या पत्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---