---Advertisement---
जळगाव : येथील महिला व बाल विकास आयुक्तालय संचलित शासकीय आशादिप महिला वसतिगृहमध्ये मागील काही महिन्यापासून विविध कारणाने नेहमीच चर्चेत येत आहे. आता पुन्हा एकदा एका गतीमंद मुलीला सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास वसतिगृहातील दुसऱ्या एका मुलीने मारहाण केल्याची खळबळजनक घटना महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने उघड झाली आहे. यावर आता चौकशी समिती नेमली गेली असून या घटनेची सखोल माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील शासकीय आशादिप महिला वसतिगृह येथे दि. ४ जुलै 2025 रोजी सकाळी 7 ते 8 वाजे दरम्यान एका ३२ वर्षीय मतीमंद मुलीला याच वसतिगृहातील एक ते दोन मुलींनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत महिला पोलिस कर्मचारीने अधीक्षक यांच्यासह जिल्हा महिला बालविकास अधिकारी तडवी यांच्याकडे ही तक्रार गुरुवारी ( १० जुलै ) रोजी आली असता त्यांनी तत्काळ यावर चौकशी समिती नेमली. त्यांनी सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. मात्र या वसतीगृहातील महिला अधीक्षकांनी अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कुठलीही तक्रार दिली नाही.
---Advertisement---
आशादिप महिला वसतिगृह येथे शुक्रवारी ( ४ जुलै ) रोजी सकाळी ७ ते ८ वाजे दरम्यान घटना घडल्यानंतर येथील महिला पोलीस कर्मचारीने घटना घडून ५ दिवस झाल्यावर तक्रार केली. मात्र, तोपर्यंत महिला अधीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कुठलीही तक्रार का केली नाही याची देखील चौकशी होणे महत्वाचे आहे. महिला अधीक्षकांनी यांनी जिल्हा महिला बालविकास अधिकारी तडवी यांच्याकडे अद्याप कुठलीही तक्रार नोंदविली नसल्याचे श्री. तडवी यांनी सांगितले आहे. तर महिला अधीक्षकांनी घटना घडली तेव्हा जे कर्मचारी त्याठिकाणी होते त्यांना याबाबत विचारणा केली व नोटीस देखील दिली असल्याचे यावेळी महिला अधीक्षकांनी सांगितले आहे.
गेल्या काही महिन्यापासून आशादीप वसतीगृहात झालेल्या दोन ते तीन प्रकरणामुळे व कर्मचारीच्या चुकीमुळे नेहमीच वादात सापडत आहे. यावर आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, महिला अधीक्षक गेल्या काही महिन्यापासून घडलेल्या घटनेबाबत पोलिसांमार्फत गेलेल्या तक्रार वरिष्ठ ऐकत आहे. मात्र, माझी बाजून वरिष्ठ ऐकत नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे महिला अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये कुठलाही ताळमेळ बसत नसल्याचे समोर आले