---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात १४९ गावे ग्रामपंचायती इमारतीच्या प्रतीक्षेत

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात नविन ग्रामपंचायत इमारतीसह स्मशानभूमीची देखील १४९ गावांनी मागणी केली आहे. यासाठी पुन्हा ग्रामपंचायत विभागाला निधीची आवश्यकता असणार आहे. जिल्ह्यातील २५९ गावांना स्मशानभूमीची गरज असून त्याअनुषंगाने या गावांकडून प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे सादर करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून स्मशानभूमी, नविन ग्रामपंचायती, सांत्वन शेड, संरक्षण भिंत, पोटरस्त्यासाठी जि. पच्या ग्रामपंचायत विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.


ग्रामपंचायत विभागाकडून मागविण्यात आलेल्या प्रस्तावात जिल्ह्यातून २५९ गावांनी स्मशानभूमीची मागणी केली आहे. त्यासाठी २२ कोटी पेक्षा अधिक निधी लागणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेला यंदा जिल्हा नियोजनकडून जनसुविधेसाठी ५९ कोटीचा निधी मंजुर झाला आहे.

---Advertisement---

नागरी सुविधेसाठी ५ कोटी व यात्रास्थळासाठी ८ कोटी निधी प्रस्तावित आहे. ग्रामपंचायत विभागाला ७२ कोटीच्या निधीतून साधारणतः २० कोटी निधी दायीत्वामध्ये जाणार असुन दायित्व वगळून दिड पटीचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे यंदा जनसुविधेचे सर्वाधिक ६८ कोटीचे तर नागरी सुविधेचे ३.४३ कोटीचे व यात्रास्थळाचे ७कोटी ३३ लाखांचे नियोजन होणार आहे.

जिल्ह्यातभरातून या पुर्वीच १०० स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यातून कामे सुरू झाली असुन आता २५९ गावांना स्मशानभूमीसाठी मागणी केली आहे. त्यासाठी २२ कोटी पेक्षा अधिक निधी लागणार आहे. यासह जिल्ह्यातुन प्रत्येक तालुक्यातुन सांत्वन शेड व संरक्षण भिंतीचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यातून सांत्वनशेडचे ७६७संरक्षण भिंतचे ७९४ असत्य सांगण्यात आले आहे. सतावर आले देखील ६०९ प्रस्ताव आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---